बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात पहिल्या क्रमांकाची
सन १९२७ च्या दि कॉटन मार्केट अन्वये कॉटन मार्केट कमिटी बारामती या नावाने दि .१६/१२/१९३५ रोजी या संस्थेची स्थापना झाली.सुरवातीस कापूस हा शेतमाल नियमानाखाली आणला गेला त्यानंतर दि ऍग्रीकल्चर प्रोड्युस मार्केट ऍक्ट नुसार १९३९ साली कॉटन मार्केट कमिटी बारामतीचे रूपांतर दि ऍग्रीकल्चर प्रोड्युस मार्केट कमिटी,बारामती यामध्ये झाले. तदनंतर दि. ०१/०६/१९४८ पासून गुळ शेतमाल नियमनाखाली आणला गेला व बाजाराचे क्षेत्र म्हणून बारामती तालुक्यातील नीरा गावाचे आसपासची १६ गावे वगळून उर्वरित तालुका हा मार्केट क्षेत्र म्हणून जाहीर करणेत आले. दरम्यानचे कालावधीत सरकारच्या अधिक धान्य पिकवा या धोरणामुळे बाजार समितीचे कामकाज बंद पडले व तदनंतर गुळ व कापूस या वस्तूंचे प्रत्यक्ष नियमन दि ०३/१२/१९५२ पासून पुन्हा सुरु झाले.
दि २४/०२/१९५५ पासून ज्वारी, बाजरी, गहू खपला, हरभरा, तुर, करडई, कांदे व भुईमूग शेंग हा शेतमाल नियमानाखाली आणला गेला. दि ०१/०९/१९५६ पासून जनावरे, शेळ्या - मेंढ्या, वैरण मोसंबी साळ तांदूळ एरंडी या वस्तूंचे प्रत्यक्ष नियमन सुरु झाले.
दि १३/११/१९७३ पासून मूग उडीद यांचे नियमन सुरु झाले. याखेरीज मका हुलगा बटाटे चिंच व सरकी याही वस्तू बाजार समितीने नियमाखाली आणल्या आहेत. या व्यतिरिक्त आंबा केळी द्राक्ष, डाळिंब, लिंबू, चिक्कू, कलिंगडे, पपई, पेरू, बोरे, लसूण, मिरची, आले, पालेभाज्या व फळभाज्या इ शेतमाल आणि दि ०४/११/२००८ पासून साखर, तेल, तूप, करडई तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल इ. सर्व प्रकारची फुले हिरडा वाल मासळी व मासे खुरासनी अंजीर मोसंबी, संत्रा, सीताफळ, जांभूळ, नारळ शहाळे, रामफळ, आवळा, शेंडनें, हळद, बेदाणे, मसाले पदार्थ, काजू, बदाम, कोंबड्या,अंडी, वाख,वराह,गाढव कातडी लाकूड व बांबू या वस्तू नियमानाखाली आणल्या आहेत.
बाजार समिती कायदा दि २५/०५/१९६७ पासून लागू झाला व आता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमय ) अधिनियम १९६३ चा बाजार विषयक कायदा व नियम १९६७ यानुसार बाजार समितीचे कामकाज चालू आहे.