सुविधा उपक्रम

इलेक्ट्रॉनिक भुईकाटा

६० टनी क्षमतेचा इलेक्ट्रॉनिक भुईकाटा बारामती मुख्य यार्डात कार्यरत असून साधारण दररोज सर्व साधारण ४० - ६० वाहनाचा वजन काटा होतो. वजन काट्यामुळे व्यापारी व शेतकरी यांची फार मोठी सोय झाली आहे. संस्थेच्या विश्वासाहर्तामुळे एम.आय.डी.सी.बारामती येथील वहानेसुद्धा वजन करण्यास येथे येतात

यांत्रिक चाळणी

बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी २ यांत्रिक चाळणी आणि २ डीस्टोनर मशिन बसविल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्याने आपला शेतमाल स्वच्छ करुन विकावा हा उद्देश. शेतमालाचे स्वच्छता व ग्रेडींग केल्यामुळे जास्तीत जास्त भाव शेतकऱ्यास मिळून ग्राहकांना स्वच्छ माल मिळत आहे. तसेच व्यापाऱ्यांना ही बाहेरच्या बाजारात माल पाठविताना स्वच्छ माल करुन पाठविता येत आहे.

रयतभवन

प्रमुख बाजार आवारात वेळोवेळी शेतकऱ्यांचे मेळावे भरविणे, शेती उत्पादन वाढविणे व विकासाचे दृष्टीने कृषि प्रदर्शन भरविणे तसेच सांस्कृतीक कार्यक्रमा करीता किंवा लग्न समारंभा करिता सुविधा असणे गरजेचे झाल्याने या एकूण व तत्सम संबंधित प्रकारच्या विविध उपयोगी कामाकरीता समितीने रयतभवन ही इमारत बांधुन वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी त्याचा वापर करीत आहे. सदर रयतभवनाचा उपयोग शेतकरी सहलीला मुक्कामाच्या सोयीसाठी,शेतकरी निवासासाठी केला जातो .

पेट्रोल पंप

शेतकरी,व्यापारी व इतर बाजारघटकांचे सोईसाठी २०१२ पासुन इंडियन ऑईल कंपनीचा अद्यावत पेट्रोलपंप कार्यान्वीत केला व त्यांचे सोईसाठी २४ तास पंप सुरु ठेवला आहे.

भाजीपाला व फळ फळावळे बाजार

भाजीपाला व फळफळावळे बाजार जळोची उपबाजार आवारात सुरु असुन येथे समितीने ५६ गाळे व्यापाऱ्यांना भाड्याने दिले आहेत . भाजीपाला व फळ फळावळे यांचा लिलाव रोज सकाळी ६ वाजता चालु होऊन १० ते ११ वाजेपर्ङ्मंत पूर्ण होतो. तालुका पातळीवर भाजीपाला मार्केट विकसित केले आहे. हे मार्केट कमी पडत असल्याने जळोची येथे अद्यावत भाजी मार्केटची उभारणी करुन आणखी २८ व्यापारी व शेतकऱ्यांची चांगली सोय झालेली आहे.

गांडूळ खत प्रकल्प

बाजार आवारातील शेण कचरा, चिपाडे, भाजी मंडई कचरा, रयतभवन कचरा इ.पासून बाजार समिती गांडुळ खत निर्मिती करते. गांडुळ खताची विक्रीचा दर रु.४००० प्रती टन असा ठरविण्यात आला आहे.बाहेरच्या दरापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना थेट खत विक्री केली जाते. या खताचा वापर शेतकरी फळबाग,ऊस,पॉलीहाऊस मधील शेती यासाठी करीत आहेत.

सेल हॉल

भुईमूग शेंग, तेलबिया, गुळ इत्यादी चे विक्रीसाठी ७० ल २०० फुट साईजचा भव्य सेल हॉल शेतकऱ्यांच्या शेतमालाची उन-पाऊसांपासून संरक्षण मिळणेकरीता बांधुन शेतकरी व व्यापाऱ्यांना मोफत सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कांदा विक्रीसाठी ६० ल १२० चे विक्री शेडची सोय वजन काट्या शेजारी केली आहे त्यामुळे कांदा मार्केट विकसित होणेस मदत झाली आहे . मात्र सध्या कांदा विक्री जळोची मार्केट मध्ये सुरु असल्याने भुसार मालविक्रीसाठी हा सेल हॉल वापरला जातो

प्रोजेक्शन टी. व्ही.

शेतकरी व व्यापारी यांच्याकरीता देशातील व राज्यातील प्रमुख बाजार समितीचे बाजारभाव विषयीचे मार्गदर्शन व्हावे, पिक लागवड, ड्रिप इरिगेशन, पॉली हाऊस इत्यादी सुधारीत तंत्रज्ञानाची माहीती घेणे साठी बाजार माहिती केंद्रात ६०''(इंची) प्रोजेक्शन टी.व्ही ची सोय स्वतंत्र हॉल मध्ये मुख्य कार्यालयात केली आहे. सध्या संगणकिय लिलावाचे एल.ई.डी.बसविलेने हा.टी.व्ही बाजुला काढुन ठेवलेले आहे.

जळोची जनावरे बाजार

जळोची उपबाजार येथे दि.७/११/२००७ पासून मा.पवार साहेबांच्या शुभहस्ते व मा.ना.अजितदादा व मा.ना.सुप्रियाताई यांचे प्रमुख उपस्थितीत जनावरे बाजार शुभारंभ करुन दर गुरुवारी तेथे गाय, म्हैस, बैल, शेळी,मेंढी व वैरण याकरिता स्वतंत्ररित्या अद्यावत बाजार आवार विकसीत केला आहे . बाजार समितीने जनावरे बाजारात आवश्यक सुविधा पुरविल्या असून तो आदर्श जनावरे बाजार शोभत आहे.

बाजार समितीत असलेल्या इतर सुविधा व उपक्रम